मुंबई : महाविकास आघाडी सरकारला MIM पक्षाकडून युतीची ऑफर आली. त्यावरून नेहमीप्रमाणे भाजपने शिवसेनेवर टीका केली. हिंदुह्रदयसम्राट ऐवजी शिवसेनेने आता जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं दिसत आहे, असा खरमरीत टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आताही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवू असा इशारा दिला. औरंगाबाद येथे झालेल्या सभेत राज यांनी ४ मे पर्यंत भोंगे उतरविले नाही तर पुढे जे काय होईल त्याला तुम्ही जबाबदार असाल असा इशारा सरकारला दिला. 


तर, राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ ट्विट केला. 'ज्यावेळी माझे सरकार येईल त्या दिवशी रस्त्यावरील नमाज पठण बंद केलं जाईल. जर आमच्या हिंदूकडून काही त्रास होत असेल तर मला येऊन भेटा. कारण धर्मापेक्षा राष्ट्रवाद हा मोठा आहे. मशिदीवरील अनधिकृत भोंगे आणि रस्त्यावरील पठण बंद केले पाहिजे, असे बाळासाहेब यांनी स्पष्ट केले होते याची आठवण शिवसेनेला करून दिली. 


त्यावर संजय राऊत यांनी हवशे नवशे यांनी आम्हाला बाळासाहेब शिकवू नये असे सुनावले. एकंदरीतच मुस्लिम बांधवाच्या मशिदीवरून सुरु झालेलं हे राजकारण आता शिवसेना आणि मनसे संघर्षावर येऊन पोहोचलं आहे.


MIM कडून युतीची ऑफर आली त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी “शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारांचे आहेत. ज्यांचा आदर्श औरंगजेब आहे. त्यांच्यासोबत युती शक्य नाही”, असं म्हटलं होतं. 


शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी मागणी करणाऱ्या MIM सोबत आम्ही सत्ता मिळत असली तरी जाणार नाही. ही युती शक्य नाही असं स्पष्ट केलं होतं. पण, याच शिवसेनेने एकेकाळी मुस्लिम लीग सारख्या पक्षासोबत युती केली होती याची आठवण या निमित्ताने झाली. 


काँग्रेस आणि शिवसेनेच पडद्याआड राजकारण सुरु होतंच. १९८० च्या दशकांपर्यंत ही छुपी ‘युती’ चालू होती. शिवसेनेने राजकीय वाटचाल सुरु केली आणि शिवसेनेने प्रा. मधू दंडवते याच्या प्रजासमाजवादी पक्षाबरोबर १९६८ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पहिली अधिकृत युती केली होती.



शिवसेनेसारखीच एक कट्टर उजवी विचारसरणी असणारा पक्ष म्हणजे मुस्लिम लीग. १९७३ - ७४ साली मुंबई महापालिकेची महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी मुस्लिम लीगच्या नगरसेवकांना सोबत घेतलं होतं. तर, १९७९ मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि मुस्लीम लीगची युती झाली होती.


शिवसेनेने दलित पँथर, काँग्रेस, अन्य पक्ष या पक्षांसोबत कधी उघड तर कधी छुपी युती केली. कम्युनिस्ट पक्ष हा अपवाद वगळता शिवसेनेने त्या त्या काळी विशिष्ट परिस्थितीत बव्हंशी पक्षासोबत युती केली होती.