नवी मुंबईत बडोदा बॅंक दरोडा, सीसीटीव्ही फुटेज हाती
नवी मुंबईत बडोदा बँकेवर पडलेल्या दरोड्यासाठी चोरट्यांनी खणलेल्या भुयाराची दृष्यं समोर आलीयेत. बँक ऑफ बडोदाच्या शाखेमध्ये दरोडा टाकून ३७ लॉकर फोडल्याचं उघड झालं होतं.
नवी मुंबई : नवी मुंबईत बडोदा बँकेवर पडलेल्या दरोड्यासाठी चोरट्यांनी खणलेल्या भुयाराची दृष्यं समोर आलीयेत. बँक ऑफ बडोदाच्या शाखेमध्ये दरोडा टाकून ३७ लॉकर फोडल्याचं सोमवारी उघड झालं होतं. या दरोडे खोरांची हालचाल सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
बँकेपर्यंत भुयार खणण्यात आले
बडोदा बँकेच्या जुईनगर शाखेपासून पाच दुकाने सोडून असलेला एक गाळा भाड्याने घेऊन त्यातून बँकेपर्यंत भुयार खणण्यात आले होतं. दरम्यान, जवळपास ७० फूट भुयार खोदकाम करताना कोणताही आवाज आला नाही तसेच याबाबत कोणाला काहीही संशय आला नाही. शनिवार, रविवार सुटी असल्याने बॅंक बंद होती. याचाच फायदा घेत डरोडेखोरांनी बॅंकेची लूट केली.
जनरल स्टोअरमधून हे भुयार खोदलं
जुईनगरमधील बालाजी जनरल स्टोअरमधून हे भुयार खोदण्यात आले होते. या भुयारामध्ये चढण्या-उतरण्यासाठी पायऱ्याही बांधून काढण्यात आल्याचे दिसत आहे. गेले काही महिने गुप्तपणे हे काम सुरू असताना आसपासच्या लोकांना संशय कसा आला नाही, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.