बारामती: विद्याप्रतिष्ठान मध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात
विद्यार्थी व शिक्षक या दोन्ही गटातील एकूण २२ शोधनिबंधांचे सादरीकरण या परिषदेमध्ये होणार आहे. संशोधकांना आपल्या संशोधनाच्या सादरीकरणासाठी या परिषदेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
बारामती : विद्याप्रतीष्ठान माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेला सोमवार (दि १२ रोजी) रोजी सुरुवात झाली. व्यावसायिक बुद्धिमत्ता व डिजीटायझेशन यातील बदलाचे प्रवाह या विषयावर सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या कालावधीतील दोन दिवसामध्ये विविध संशोधकांच्या शोध निबंधांचे सादरीकरण होणार आहेत.
या परिषदेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ म्हणून भारता बरोबरच जॉर्डन, सुदान, लेबनोन व थायलंड या देशातील तज्ञांनी सहभाग घेतला आहे. विद्याप्रतीष्ठान माहिती व तंत्रज्ञान विभागच्या सभागृहात या परिषदेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी सहभागी संशोधकांचे शोध निबंध डिजीटल प्रकारात (सीडी) द्वारे प्रकाशित करण्यात आले. यावेळी डॉ. युनेस खताबेह(जॉर्डन), डॉ. खालिद अलीओमर (सुदान), डॉ योगेश उपाध्याय (न्यू दिल्ली), डॉ शिवानंद गोरानाळे (बेळगावी), वृषसेन नफाडे (पुणे), दीपक परदेशी (पुणे) व बारामती चेंबर ऑफ कॉमर्स कडून धनंजय जामदार उपस्थित होते. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ अमोल गोजे यांनी यावेळी प्रास्ताविक व स्वागत केले.
पहिल्या दिवसातील प्रथम सत्रातील चर्चे साठी आरटीफिशयल इंटेलिजन्स या विषयावर तज्ञांद्वारे चर्चा घडवण्यात आली. छोट्या उद्योगावर डिजीटायझेशन चा होणारा परिणाम या विषयावर विचारमंथन झाले. वृषसेन नफाडे व डॉ. युनेस खताबेह यांनी यावेळी तज्ञ मार्गदर्शन केले. या चर्चेचे संचालन डॉ अमोल गोजे यांनी केले. दुपारच्या सत्रात नव-उद्योगांसाठी आर्थिक विकास आणि डिजीटायझेशन या विषयावर चर्चा झाली. अतुल बेनेगी, डॉ शिवानंद गोरनाळे व घसन ओवाईस तज्ञ सहभागी झाले व डॉ सतीशचंद्र जोशी यांनी या सत्राचे संचालन केले.
विद्यार्थी व शिक्षक या दोन्ही गटातील एकूण २२ शोधनिबंधांचे सादरीकरण या परिषदेमध्ये होणार आहे. संशोधकांना आपल्या संशोधनाच्या सादरीकरणासाठी या परिषदेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.