योगेश खरे, नाशिक : मेहनतीचा पैसा खर्च करून आपण घर विकत घेतो, त्यासाठी लाखो रुपयांचं कर्जही काढतो.. पण तेच घर अनधिकृत निघालं तर..? तुमच्याही बाबतीत असं घडू शकतं... मग कपाळाला हात लावून बसण्याऐवजी काय खबरदारी घ्यायची?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही नवीन घर खरेदी करताय...?


निवृत्त प्राध्यापक प्रदीप जोशी यांनी आयुष्यभराची कमाई खर्च करून त्यांनी नाशिक शहरात आनंदवल्ली शिवारातील या स्वागत हाईट्स इमारतीत फ्लॅट घेतला. मात्र हा फ्लॅट अनधिकृत असल्याचं आता समोर आलं आहे. या इमारतीची जागा ही कमर्शियल वापरासाठी होती. त्यात निवासी बांधकाम करून 14 फ्लॅट्स बांधण्यात आले... शिवाय इमारतीची उंचीही नियमापेक्षा 35 सेंटिमीटरनं अधिक आहे. आता त्या सगळ्या रहिवाशांना मिळून महसूल विभागानं 18 कोटी रुपये दंड ठोठावलाय.. वयाच्या सत्तरीत हा सव्वा कोटी रुपयांचा दंड कसा भरायचा, असा प्रश्न जोशींना पडला आहे.


केवळ जोशीच नव्हे तर आणखी 13 कुटुंबांचीही या प्रकरणात बिल्डरनं फसवणूक केली आहे. ही बिल्डिंग बांधणारा पटेल नावाचा बिल्डर आता गायब आहे. तर कोर्टाचे आदेश असतानाही नाशिक महापालिकेनं नगररचना विभागाच्या 3 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. त्यात तहसीलदारांनी दंड न भरल्यानं या जागेवर आता शासन मालकीची नोटीस लावण्यात आली आहे.


फ्लॅट खरेदी करताना 


आगाऊ रक्कम देणार असाल तर त्याची अधिकृत पावती घ्यावी.
बिल्टअप आणि कार्पेट एरिया मोजून घ्यावा.
इमारतीचे कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे की नाही, ते तपासावे.
कुठल्याही बँकेकडून फ्लॅटसाठी कर्ज काढताना त्यांच्याकडून किमान ५० वर्षांचा सर्च रिपोर्ट घ्यावा.
जागेचा एनए टॅक्स भरलाय का, याची खातरजमा करावी.


अन्यथा या 14 नाशिककरांसारखी आपल्यावरही फ्लॅट गमावण्याची वेळ येऊ शकते.


बातमी: आफ्रिकेमध्ये विचित्र आजाराचा फैलाव, माणसाचा तडकाफडकी अंत