Big Breaking : महाराष्ट्र बंद होणार की नाही? हायकोर्टाने निर्णय दिला; आता काय करायचं ते उद्धव ठाकरे, शरद पवार ठरवणार
उद्याचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही. तरीही बंद केल्यास कारवाई करा. मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.
Maharashtra Band : बदलापूर अत्याचार घटनेनंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) चांगलीच आक्रमक झाली. महाविकास आघाडीने शनिवारी म्हणजे 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक दिली आहे. मात्र, हायकोर्टाने दिलेल्या निकालामुळे बंद होणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. सुनावणीदरम्यान होयकोर्टाने अत्यंत महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. बंद बाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार काय ठरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र बंद विरोधात हायकोर्टात याचिका
मुंबई उच्च न्यायालयाने मविआला मोठी चपराक लगावली आहे. मविआने उद्या पुकारलेला बंद मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवलाय. कोणत्याही राजकीय पक्षाला उद्या बंद करण्यासाठी हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे... जर कोणी बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत... मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमुर्ती अमित बोरकर यांनी हा निर्णय दिलाय..
डॉ. गुणरत्न सदावर्तेंसह इतरांची बंद विरोधात याचिका दाखल केली आहे. महाविकास आघाडीनं आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता बंद पुकारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उद्याचा बंद जनतेचा उद्रेक आणि राग व्यक्त करण्यासाठी
मविआच्या उद्याच्या महाराष्ट्र बंदला कोर्टाने परवानगी दिलेली नाही.. मात्र उद्याचा बंद जनतेचा उद्रेक आणि राग व्यक्त करण्यासाठी आहे. नागरिकांनी शांततेनं बंद पाळावं, असं आवाहन शरद पवारांनी केलंय. तर उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला केलंय.. बदलापूर अत्याचार प्रकरणी उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. यावरून आज शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सरकारचा समाचार घेतलाय. हा बंद संस्कृती विरुद्ध विकृती असल्याचंही उद्धव टाकरेंनी म्हटलंय. तर सरकारनं उद्याच्या बंदवेळी जनतेला जेलमध्ये टाकून दाखवावं, असं आव्हान नाना पटोले यांनी केलंय.
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना आणि काँग्रेसच्या पदाधिका-यांना नोटीसा बजावण्यात आल्यात... मविआनं पुकारलेल्या उद्याच्या बंदमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महत्वाचे नेते पदाधिकारी आणि शिवसैनिकांना नोटीस देण्यात येत आहेत.मुंबईतील संबंधित पोलीस स्टेशनकडून स्थानिक कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्यात...