नवी दिल्ली : नागपूर अधिवेशनात मोठी घटना घडणार आहे. यावेळेसचे नागपूर अधिवेशन ऐतिहासिक असेल. अशी प्रतिक्रिया कॅबिनेटमंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. बहुजनसमाजाचे नेते भाजपवर नाराज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नितीन राऊत यांच्या दाव्याला तथ्य आहे. कारण महाराष्ट्र सरकारमधील ते मोठे मंत्री आहेत. त्यामुळे महाविकासआघाडीमध्य़े काय सुरु आहे हे त्यांना नक्कीच माहित आहे. नागपूर अधिवेशनात एकनाथ खडसे हे पक्ष सोडतील अशी शक्यता आहे. भूकंपाचं केंद्र आता नागपूर अधिवेशन असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपमध्ये अनेक जण नाराज आहेत. त्यापैकी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे ही दोन मोठी नावे आहेत. गोपीनाथ गडावर झालेल्या मेळाव्यात खडसे यांनी देखील याचे संकेत दिले होते.' इतका अपमान होऊन पक्षात राहण्यात काय अर्थ आहे. पंकजाताई भाजपमध्येच राहतील पण माझा काय भरोसा धरु नका.' असं देखील त्यांनी भाषक करतांना म्हटलं होतं. खडसेंनी पहिल्यांदाच नाव घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. 


'आम्हाला पाडण्याचं पाप तुम्ही केलं. असं देखील त्यांनी म्हटलं. तुम्ही कसे ही वागलात तरी आम्ही तुमच्यासोबतच राहू असं जानकरांनी म्हटलं, मी नाही म्हणत आहे. माझ्य़ावर खोटे आरोप केले गेले हे लोकांनी मान्य केलं. पण आमचेच लोकं हे मान्य करायला तयार नाहीत.' असा टोला देखील त्यांनी फडणवीस यांना लगावला. त्यामुळे आता नितीन राऊत यांच्या संकेतानंतर खडसे हे नेमके कोणत्या पक्षात जातात याची चर्चा सुरु झाली आहे. कारण याआधी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.


१६ डिसेंबर २०१९ ते २१ डिसेंबर २०१९ दरम्यान विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. यंदाचे अधिवेशन नागपूर येथे होत आहे. हे हिवाळी अधिवेशन नक्कीज राजकीय भूकंप करणारं असेल असं एकंदरीत वातावरण दिसतं आहे.