Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाचे (Mumbai Goa Highway) काम तब्बल 12  वर्षापासून रखडल आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, ही डेडलाईन चुकली आहे. मात्र, नविन वर्षात मुंबई गोवा महामार्गाबाबत सर्वात मोठी अपटेड समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगदे लवकरच सुरु होणार आहेत. 


हे देखील वाचा... महाराष्ट्राची देवभूमी! दोन्ही बाजूला पाण्याने पाण्याने वेढलेले कोकणातील चमत्कारिक मंदिर कधीच संकटात सापडत नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणातून जाणारा मुंबई-गोवा हायवे गेल्या 12 वर्षांपासून तयार झालेला नाही. या महामार्गावरील अनेक पूलांची कामं अर्धवट अवस्थेत आहेत.  महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासी त्रस्त झाले आहेत.  मुंबई-गोवा महामार्गाचे काम  डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल,अशी महत्त्वपूर्ण माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. मात्र, या महामार्गाचे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नसले तरी आता याबाबत दिलासादायक अपडेट समोर आली आहे. 


कशेडी घाट  मुंबई-गोवा महामार्गावर सर्वांत अवघड आणि धोकेदायक घाट आहे. कोकणात तसेच कोकणमार्गे गोव्यात जाण्यासाठी कशेडी घाटाशिवाय पर्याय नाही. मात्र, कशेडी घाटात मोठा बोगदा बांधण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण कशेडी घाटातून प्रवास करावा लागणार नाही. 


हे देखील वाचा... एलिफंटाला जाण्यासाठी पर्यायी मार्ग; फक्त गेट वे ऑफ इंडियाच नाही तर या मार्गाने देखील जाता येते 


कशेडी घाटात येण्या जाण्यासाठी सुमारे दोन किलोमीटरचे दोन स्वतंत्र बोगदे बांधण्यात आले आहेत.  कशेडी बोगदा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कशेडी घाटातील 45 मिनिटांचा प्रवास या बोगद्यामुळे 8 मिनिटांत होणार आहे. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास सुपरफास्ट होणार आहे. 


मुंबई गोवा महामार्गावरील  कशेडीतील दोन्ही बोगदे 26 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कशेडी घाटातील बोगदे सुरु होणार असले तरी संपूर्ण मुंबई गोवा महामार्गाराचे काम कधी पूर्ण होणार असा सवाल कोकणवासी उपस्थित करत आहेत. 


रत्नागिरीच्या लांजा शहरातील बांधकामं पाडण्यास सुरूवात झालीये. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणच्या कामात ही बांधकामं अडथळा ठरत होती. त्यामुळे अनेक वर्षानंतर लांजामधील ही बांधकामं पाडण्याचं काम हाती घेण्यात आलंय. लांजा तहसीलदार, पोलीस निरीक्षक, बांधकाम विभागाचं अधिकारी याठिकाणी उपस्थित होते.