Harihareshwar Temple Konkan : कोकण म्हंटल की डोळ्यासमोर उभा राहतो तो अथांग समुद्र किनारा. याच कोकणाला अध्यात्मिक वारसा देखील लाभलेला आहे. कोकणात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. कोकणात असेच एक प्राचीन मंदिर आहे. दोन्ही बाजूला पाण्याने पाण्याने वेढलेले कोकणातील चमत्कारिक मंदिर कधीच संकटात सापडत नाही. कोकणातील हे ठिकाण महाराष्ट्रातील देवभूमी म्हणून देखील ओळखले जाते.
श्री हरिहरेश्वर मंदिर असे या मंदिराचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील श्री हरिहरेश्वर मंदिर दक्षिण काशी क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. हिरव्यागार वनराईने नटलेला डोंगर समोर, समुद्रकिनारे डोलणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागा आणि पांढऱ्या शुभ्र वाळूचा अथांग समुद्र. याच समुद्र किनाऱ्याजवळ श्री हरिहरेश्वर हे तीर्थ क्षेत्र आहे. राज्याच्या कानापोऱ्यातून भाविक येथे श्री हरिहरेश्वराच्या दर्शनासाठी येतात.
सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळेत त्याच संगमवार हरिहरेश्वर हे सुंदर गाव वसलेले आहे. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णूपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णूतीर्थ अशी अनेक मंदिरे आहेत. हरिहरेश्वरच्या दक्षिण दिशेला आणि उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंगांची स्थाने आहेत. देशात ऐकूण 108 तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते.
ब्रह्मगिरी, विष्णूगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत हरिहरेश्वर हे गाव वसलेले आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे. श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची मंदिरे देखील महत्त्वाची स्थाने आहेत.
हे मंदिर शिवकालीन असावे असा अंदाज आहे. बांधकामाच्या निश्चित कालखंडाची कोणतीच नोंद नाही पहिल्या बाजीरावाने 1723 मध्ये या जोर्नोद्धार केल्याचे सांगितले जाते. देवाच्या दर्शनानंतर प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बाजूने पाण्याने वेढलेले असले तरी कितीही मोठी आपत्ती आली तरी या मंदिराला काहीच होत नाही.
हरिहरेश्वर हे मुंबईपासून सुमारे 230 किलोमीटर तर पुण्याहून जवळपास 180 किलोमीटर अंतरावर आहे. एस.टी. बस किंवा खासगी वाहनाने येथे जाता येते. पुण्याहून मिळशी, भोरवरून महाड मार्गे, वाई वरून महाबळेश्वर मार्गे येथे जाता येते. कोकण रेल्वेने गेल्यास माणगाव हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.