नाशिक : जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा (bird flu) शिरकाव झाला आहे. सटाणाच्या वाठोडा गावात घरगुती पाळीव कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे. (bird flu in Nashik district)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाठोडा गावात मोठ्या प्रमाणावर गावठी कोंबड्या पाळल्या जात आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या सुमारे तीनशे कोंबड्या मेल्याने खळबळ उडाली होती.सदर कोंबड्याचा मृत्यु हा फ्ल्यूने झाल्या. त्यांचा बर्ड फ्ल्यूचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे प्रशासनाकड़ून सांगण्यात आल्याने प्रशासन खबडून जागे झाले. 


एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून परिसरात कोणतेही व्यावसायिक पोल्ट्रीफार्म नसल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही.पोल्ट्री संदर्भात योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना  जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व पोल्ट्री धारकांना दिल्या आहे.मृत कोंबड्या खड्डे करुन पुरण्यात आल्या आहेत.



बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार बाधित परिसरातील कोंबड्याचे शास्त्रोक्त पद्धतीने कलींग आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून जिल्ह्यातील प्रशासन आज सकाळपासून वाठोडा गावात तळ ठोकून बाधित परिसरात शास्त्रोक्त पद्धतीने कोंबड्याची कलिंग करून विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया राबवीणार आहे. दरम्यान बर्ड फ्ल्यू शिरकाव झाल्याने वाठोडा गावातील ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.