Udhhav Thackrey : रत्नागिरीमधल्या सभेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. समोरच्याला टोप घातल्यावर डोकं खाजवायला मिळत नाही आणि आज आपण कोणत्या पक्षात आहोत हेच त्याला कळत नाही अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता नारायण राणेंचा समाचार घेतला. तसंच स्वतःच्या उंचीनुसार तरी प्रकल्प कोकणात आणलात का, असा सवाल विचारत त्यांनी राणेंना डिवचलं. आमचं सरकार आल्यावर ED, CBI, IT या मोदींच्या घरगड्यांना दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. कोरोनापेक्षाही भाजपची हुकूमशाही भयंकर असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. या सभेसाठी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरेसुद्धा उपस्थित होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. 56 इंचाची छाती गेली कुठे आणि अटलजींना अशी सत्ता नको होती. त्यांचा आत्मा आता ढसाढसा रडत असेल अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदींनी सुनवलंय. बाळासाहेब ठाकरेंची आत्मा यांच्या कारनाम्यामुळे दुखी होत असेल अशी टीका मोदींनी कोल्हापूरच्या सभेत केली होती. त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले.


कांदा प्रश्नावरून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. कांदा निर्यात बंदी उठवली आता भाजपला निर्यात करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीच्या सभेतून केलंय. गुजरातच्या शेतक-यांसाठी निर्णय घेतला याचा आनंद आहे. मात्र, महाराष्ट्रातल्या शेतक-यांनी काय घोडं मारलंय, असा सवाल शरद पवारांनी पुण्याच्या सभेतून विचारलाय.  आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर दिलंय. खोटारट्यांवर लक्ष देऊ नये, अशी प्रतिक्रिया आदित्य यांनी कोल्हापुरात दिलीय. पुरात उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना मातोश्रीवर एकटेच सोडले ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेले होते, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कोल्हापुरात केला होता.