पुणे : भाजप (BJP) चित्रपट आघाडीचा अध्यक्ष रोहन मंकणीसह (Mohan Mankani) 8 जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत भारतीयांचे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये वाचविलेत. बॅंकांच्या खातेदारांची गोपनीय माहिती (डेटा) चोरुन विक्री करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. दरम्यान,  पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी 4 जण नामांकीत कंपन्यांमध्ये संगणक अभियंता होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेटा खरेदीवेळी 25 लाख रुपये घेताना 10 जणांना अटक, अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्‍यता आहे. काही बॅंकेच्या देशभरातील खातेदारांची गोपनीय माहिती चोरुन, या माहितीची विक्री करण्याचा मोठा डाव पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने हाणून पाडला.



 या डेटा चोरी व विक्री करण्याच्या प्रयत्नातून खातेदारांच्या खात्यातुन जाणारे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये पोलिसांमुळे वाचले. या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी 25 लाख रुपये स्विकारताना 10 जणांना अटक केली असून अन्य काही जणांची चौघांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी चौघेजण नामांकीत कंपन्यांमध्ये संगणक अभियंता होते.