Pankaja Munde on Laxman Hake protest : जालन्याच्या वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आंदोलनसाठी बसले आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. आता यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत सरकारला धारेवर धरलं आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे. 


पंकजा मुंडेंचे ट्वीट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकजा मुंडे यांनी नुकतंच ट्विटरवर एक ट्वीट केले आहे. यावर त्यांनी "राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे", असे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे. 



ओबीसी समाज आक्रमक


दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको या मुद्दयावर आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून अंतरवाली सराटीपासूनच 4 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडीगोद्री येथे उपोषणावर बसलेत. त्यामुळे लक्ष्मण हाके सध्या राज्याच्या चांगलेच चर्चेत आले आहेत.