Prajakta Mali Vs Suresh Dhas : भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळींसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद पेटलाय. अभिनेत्री प्राजक्तानं धस यांच्याविरोधात महिला आयोगात धाव घेतली आहे. धस यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी माझी जाहीर माफी मागावी, अशी मागणी प्राजक्तानं केलीय. सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी समस्त महिलांचा अपमान केल्याचा आरोपही प्राजक्ता माळीनं केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, आपण प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नसल्याचं प्रत्युत्तर सुरेश धस यांनी दिलंय. आपण काहीच आक्षेपार्ह बोललो नसल्याचा दावा धस यांनी केलाय. इतकंच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही धस यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही प्राजक्ता माळीनं सांगितलंय. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यांसदर्भात कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचंही प्राजक्ता माळीनं म्हटलंय.


बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी याप्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेत. याविषयी बोलतानाच सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्त माळीच्या नावाचा उल्लेख केला होता. 


धस यांच्या याच वक्तव्यावरून प्राजक्ता माळी यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. धस यांच्याविरोधात माळी यांनी महिला आयोगात धाव घेतली आहे. याप्रकरणात काय कारवाई होणार, हे पाहणं आता महत्त्वाचंय. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे तीन आरोपी फरार आहेत.


संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. आरोपींना अटक करता येत नसेल तर मंत्र्यांना अटक करून आता टाकण्याची मागणीही मनोज जरांगे यांनी केली आहे बीडमधील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिलीय. आरोपी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होणारच. असं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलं.