मुंबई: राज्यात निवडणुकीत प्रचारासाठी भाजपाने ४१ स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. मोठ्या सभेपासून ते छोट्या सभागृहातील सभा असे भाजपाच्या प्रचाराचे सूत्र असेल. स्टार प्रचारकांमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, सुषमा स्वराज, शिवराज सिंह, मुख्तार अब्बास नक्वी, मुरली मनोहर जोशी, नितीन गडकरी, पीयूष गोयल या केंद्रीय नेत्यांसह राज्यातील माधव भंडारी, राम शिंदे, गिरीश महाजन अशा ४१ प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीतील स्थानिक राजकारण, जातीय समीकरणे, विरोधी पक्षांचे उमेदवार अशा विविध गोष्टी लक्षात घेऊन ही प्रचारकांची फौज मैदानात उतरवली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपकडून आतापर्यंत लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये लालकृष्ण अडवाणी, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. याशिवाय, बिहारमध्ये भाजपा, जदयू आणि एलजेपीच्या प्रदेशाध्यक्षांनी आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.


तीर्थयात्रेला जायचेय म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार नाही- उमा भारती


आजपासून बरोबर दोन महिन्यांनी लोकसभेच्या निकालांचा कल स्पष्ट झालेला असेल. ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान सात टप्प्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाची मोजणी २३ मे रोजी होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या रणसंग्रामाची प्रत्येक बातमी सर्वप्रथम देण्यात झी २४ तासची सगळी टीम सज्ज आहे.


भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; पुण्यात गिरीश बापटांनी मारली बाजी