मुंबई : इंदुरीकर महाराजांचं विधान चुकीचं असून त्याच समर्थन करत नसल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. इंदुरीकर समाज प्रबोधनाच काम करतात. मी त्यांच्या अनेक किर्तनाला गेलोय. ते अनेक सामाजिक विषय हाताळतात. त्यांच महिलांविषयीचं विधान चुकीचं आहे. त्याच समर्थन होऊ शकत नाही. पण एका विधानानं माणूस चुकीचा होत नाही. इंदुरीकर महाराजांच्या विधानाचे समर्थन करत नसल्याचे ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभुमीवर इंदुरीकर महाराजांनी आपल्या समर्थकांना पत्रामार्फत संदेश दिला आहे. यामध्ये त्यांनी शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. न्यायाच्या मार्गाने जाणार असल्याचे त्यांनी या पत्रातून स्पष्ट केले आहे.  



इंदुरीकर महाराजांनी महिलांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्माण समिती आक्रमक झाली आहे. दरम्यान इंदुरीकर महाराजांविरोधात तक्रार दाखल अंधश्रद्धा निर्मुलन समितीने तक्रार दाखल केली आहे. 


महिलांविरोधात किर्तन करणाऱ्या इंदुरीकर महाराजांविरोधात अंनिसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी तक्रार केली आहे. महिलांविरोधात किर्तन करणारे... खरं तर याला किर्तन म्हणावं की नाही ? असा प्रश्न पडत असल्याची प्रतिक्रिया अविशान पाटील यांनी 'झी २४ तास'कडे केली.


तृप्ती देसाई यादेखील इंदुरीकर महाराजांविरोधात आक्रमक असून त्यांनी देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.