प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : मुंबई गोवा महामार्ग लवकरच खड्डेमुक्त(potholes on Mumbai Goa highway) होणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे(Bombay High Court )  प्रशासनाला दिले आहेत. या आदेशामुळे कोकणवासीयांना प्रवास खड्डेमुक्त  होण्याची शक्यता आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या दुर्दशेबाबत मुबई उच्च न्यायालयात जनहितयाचिका दाखल झाली होती.या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उच्च न्यायालयाने प्रशासनाला खडे बोल सुनावले असून लवकरात लवकर खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई गोवा महामार्ग चौपदरी रस्ता होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नाहीत. रस्त्याची दुर्दशा झाली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.


आज सुनावणीदरम्यान या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा रस्ता गाडी नेण्यास योग्य आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, यावर देखील न्यायल्याने प्राधिकरणाला विचारले की या रस्त्यावर फक्त वाहने चालू शकतात म्हणजे रस्ता चांगला का ? त्यावर खड्डे असतील तरी चालतील का ? तर तुम्ही न्यायालयाला गंभीर घेत नसल्याचे निरीक्षण नोंदवले.  कोर्टाने  लवकरात लवकर खड्डे बुजवण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी 4 जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे. पुढील सुनावणीत रस्त्याच्या खड्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.