निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे : लग्न एकदाच होतं त्यामुळे ते थाटामाटात आणि आनंदाचे क्षण देणारं असावं असं प्रत्येक मुलीला आणि मुलाला वाटत असतं. पण शेतकरी नवरदेवाने खास बैलगाडीतून वऱ्हाड घेऊन लग्नाला पोहोचला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातल्या भोर तालुक्यातील उत्रौली गावात लग्न सोहळ्यासाठी कार्यालयात जाण्यासाठी सजवलेली कार किंवा इतर वाहनानी न जाता, शेतकरी नवरा मुलगा थेट पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून व-हाड घेऊन कार्यालयात पोहचला.


सजविलेल्या बैलगाडीतून वऱ्हाड्यासह कासरा हातात घेऊन उभा राहून बैलगाडीचे सारथ्य करत नवरदेव शुभम शिवतरे लग्नासाठी पोहचला. सध्या गावात या लग्नाची चर्चा रंगली आहे. 


जुन्या काळात लग्नाला जायला वऱ्हाडासाठी वापरण्यात येणाऱ्या बैलगाडीचा वापर केला जात आहे. आता आधुनिक युगात पुन्हा एकदा वाढला आहे. 


ग्रामीण भागात सध्या बैलगाडीचा वाढता ट्रेंड पाहायला मिळत आहे. लग्नाला जाण्यासाठी वऱ्हाडी मंडळींची पुन्हा एकदा बैलगाडीला पसंती पाहायला मिळती. यामुळे जुन्या लुप्त झालेल्या आठवणीना उजाळा मिळतं असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.