एकदा नाही, तर दोन वेळा बैलांनी वाचवला मालकाचा जीव, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ
माणूस विसरत चालला पण मुक्या प्राण्यांनी घडवलं माणुसकीचं दर्शन, पाहा व्हिडीओ
हेमंत चापुडे, झी 24 तास, खेड : नशीब आणि प्राणीप्रेम कसं असतं ते साऱ्या लोकांनी पुन्हा पाहिलं. प्राणांनी अजून माणूसकी सोडली नाही. मुक्या बैलांनी तरुणाचा जीव वाचवला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बैलगाडा शर्यती दरम्यान एका तरुणाचा थोडक्यात जीव वाचला. गाडा जुंपल्यानंतर हा तरुण खाली पडला आणि थेट धुरेकरी बैलांच्या पायाखाली आला. त्याचवेळी दोन्ही धुरेकरी बैलांनी उडी मारली आणि त्याला पायाखालून सुखरूप बाहेर काढलं.
या सगळ्यात त्याचा थोडक्यात जीव वाचला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ही घटना नेमकी कुठली आहे हे अद्याप समजलेलं नसलं तरी मुक्या प्राण्यांनी सुद्धा माणुसकीचं दर्शन घडवलं आहे.
मुक्या प्राण्यांना जीव लावल्यावर प्राणीही मालकावर किती प्रेम करतात हेच या व्हिडिओमधून पाहायला मिळालं. चक्क बैलांनीच आपल्या मालकाचा जीव वाचवला आहे.