कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता
Rain News : राज्यात आणखी 4-5 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Rain in Maharashtra)
मुंबई : Rain News : राज्यात आणखी 4-5 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Rain in Maharashtra) 10 ऑक्टोबरदरम्यान, समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याची शक्यता असल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. तशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटात पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अरबी समुद्र ते पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत वादळी पावसाला पोषक स्थिती निर्माण होत आहे. 10 ऑक्टोबरला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे राज्यात आणखी चार ते पाच दिवस पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता आहे.
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, परभणी आदी भागांत प्रामुख्याने पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.