कोल्हापूर : Chandrakant Patil on Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. भाजपकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ दणार नाही, असे पवार यांनी म्हटले होते. यावर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जो गरजेल, तो पडेल काय? अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. (BJP responds to Sharad Pawar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2024 च्या लोकसभा निवडणुकीत 400 च्याआ वरती जागा निवडून आणायच्या आहेत. ही संधी घालवायची नाही. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूतिच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत आहेत. पवार यांच्या विधानाचा भाजपकडून समाचार घेण्यात आला आहे. भाजपाकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ दणार नाही, असं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत म्हणाले होते. तसेच, भाजपाकडून परिश्रम घेण्याची तयारी, नियोजन अशा गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचे देखील पवार यांनी यावेळी नमूद केले.  


चंद्रकांत पाटील म्हणाले, जो गरजेल, तो पडेल काय? लोकशाहीत कुणालाही काहीही बोलायचा अधिकार आहे. पण गरजेल तो पडेल काय? आम्ही आमचे काम शांतपणे करतोय. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत ते दिसेल. आणि त्या बैठकीत जाता जाता शरद पवार यांनी तरूण आमदारांना हेही सांगितले की, भाजपच्या नेतृत्वापासून काहीतरी शिका. म्हणजे आमच्यापासून काहीतरी शिकण्यासारखं आहे, पाटील म्हणाले.