नाशिक : नामको बँकेचे साडे चार कोटी चौतीस लाख पन्नास हजार रुपये थकवल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या आर्मस्टॉंग कंपनीचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. येत्या ३० नोव्हेंबरला दुपारी बँकेच्या कार्यालयात लिलावाची प्रक्रिया होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीचे संचालक, छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांनी मिळून कंपनीसाठी कर्ज घेतलं. शेफाली भुजबळ, विशाखा भुजबळ आणइ नितीन राका कर्जासाठी जामीनदार होते. यापूर्वी आर्मस्ट्राँग कंपनीविरोधात कोट्यवधींच्या कर्जवसुलीची प्रक्रिया स्टेट बँकेनंही सुरू केली आहे.


त्यामुळे आता कंपनीच्या संचालकांच्या गैरव्यवहाराच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. आता या कंपनीच्या सव्वा चार हजार चौरस मीटर जागेचा लिलाव होणार असल्यानं सध्या नाशकात चांगलीच चर्चा रंगलीय.