राळगणसिद्धी : सौर कृषी वाहिनी योजना आणि सौर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना १२ तास अखंड वीज देणं शक्य असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, सौर प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर शासनाच्या सबसिडीची बचत होणार आहे. ही योजना संपूर्ण देशात राबवणार असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


ग्रामरक्षक दलाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राळेगण सिद्धी इथं सरपंच मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेदेखील उपस्थित होते. ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याचा विचार आण्णांनी मांडला आणि त्यानुसार कायदा संमत केला असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावेली सांगितलं. ग्रामरक्षक दलामुळे अवैध धंद्यांना आळा बसेल असंही ते म्हणाले. दरम्यान या कार्यक्रमात एका युवकाने स्टंटबाजी करत मुख्यमंत्र्यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणाला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले.


दरम्यान, राज्यात सध्या वीजेचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. भारनियमनामुळे राज्यातील ग्रामिण भाग अंधारात आहे. अशा स्थितीत वाढते भारनियमन आणि वीजेचा तुटवडा यावर सरकारला मार्ग काढावा लागणार आहे.