Chinchwad Aakurdi Crime: पुणे, पिंपरी चिंचवड भागात गाव गुंडांचा धुमाकूळ पाहायला मिळतो. हातात कोयता घेऊन,कॉलर उडवत धमक्याचे देण्याचे प्रकार दिवसा उजेडीदेखील होतात. काहीजण रिल्समधून एकमेकांना आव्हान देतात तर काहीजण दुकाने-सोसायटीत घुसून खंडण्या गोळा करतात. दरम्यान आता पोलीसदेखील अलर्ट झाले असून अशा गावगुंडांचा 'जाहीर सत्कार' करुन त्यांना चांगलाच 'प्रसाद' दिला जातो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिंचवडच्या आकुर्डी भागात असाच एक प्रकार समोर आलाय. या भागात एक गुंड गेल्या अनेक दिवसांपासून दहशत पसरवत होता. हा गुंड सराईत असल्याने कोणाच्या हाती लागत नव्हता, असे असले तरी सर्वसामान्यांना याचा खूप त्रास व्हायचा. पण आता दहशत पसरविणाऱ्या सराईत गुंडाला गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केलं आहे. यामुळे इथल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. बेंद्या सोनी असे या गुंडाचे नाव असून तो रात्रच्या वेळेस अति अॅक्टीव्ह व्हायचा. 


आकुर्डी भागात रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये बेंद्या सोनी नावाच्या गुंडाची दहशत होती. अनेक दिवस त्यांना हा त्रास होत होता. अखेर या त्रासाल कंटाळलेल्या नागरिकांनी पोलिसांत यासंदर्भातील माहिती दिली.  गुंडा विरोधी पथकाला याची माहिती मिळाली. त्यांनी याला चांगलाच चोप दिला आणि बेड्या ठोकल्या.


पिंपरच्या आकुर्डी भागात एक उर्दू शाळा आहे. येथून नागरिकांची येजा होत असते. या भागात सराईत गुंड बेंद्याची दहशत होती. तो येथील रस्त्यावर शर्ट काढून फिरायचा. बऱ्याचवेळा तो दारुच्या नशेत असायचा. त्यामुळे आपण काय करतोय?यावर त्याचे नियंत्रण नव्हते. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. काहींना तर याने विनाकारण मारहाण केल्याच्या तक्रारी आल्या. 


दरम्यान गुंडा विरोधी पथका आकुर्डी येथील शाळेजवळ पोहोचले. आणि थेट घटनास्थळावरच गुंड बेंद्याला चोप दिला आणि बेड्या ठोकल्या आहेत. बेंद्या हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता बेंद्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. आपली दहशत कायम राहील, यासाठी तो सातत्याने नागरिकांना घाबरवायचा. आता पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने घटनास्थळावर जाऊन बेंद्याला उचलत चोप दिलाय. त्यामुळे पोलिसांच्या खाक्यासमोर कोणत्या गुंडाची चालत नाही, याचा अनुभव त्रास सहन करणाऱ्या नागरिकांनाही आला असेल.