CM Eknath Shinde Video Call To Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी 87 वा वाढदिवस साजरा केला. मागील काही दिवसांपासून अण्णा हजारे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिखर बँक घोटाळा प्रकरणात देण्यात आलेल्या दिसाश्याविरोधात आक्षेप घेणार असल्याच्या कथित वृत्तामुळे चर्चेत होते. मात्र आपल्याला यासंदर्भात कोणतीही कल्पना नसल्याचं सांगत अण्णा हजारेंनी अशी काही आक्षेप घेण्याचे वृत्त फेटाळून लावलं आहे. एकीकडे या प्रकरणामुळे अण्णा चर्चेत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अण्णा हजारेंना वाढदिवसानिमित्त व्हिडीओ कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द शिंदे यांनीच अण्णांबरोबर व्हिडीओ कॉलवर बोलत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.


सेंच्युरी मारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आपला आशीर्वाद, मार्गदर्शन असेच लाभत राहू द्या. खूप खूप शुभेच्छा. आरोग्य चांगलं राहू द्या. शतायुशी व्हा. सेंच्युरी मारा," अशा शुभेच्छा मुख्यमंत्री शिंदेंनी अण्णा हजारेंना व्हिडीओ कॉलवर दिल्या. पलिकडून अण्णांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत निरोगी राहिलं पाहिजे, असं विधान केलं. यावर मुख्यमंत्र्यांनी, "निरोगी ठेवणार परमेश्वर तुम्हाला. तुमची लोकांना, समाजाला, राष्ट्राला गरज आहे," असं अण्णांना सांगितलं. "त्याची इच्छा असेल तसं होईल," असं अण्णा यावर म्हमाले. "आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. खूप खूप शुभेच्छा," असं मुख्यमंत्री व्हिडीओ कॉलच्या अखेरी म्हणाल्याचं दिसत आहे.


नक्की वाचा >> '..तर तुमच्याविरुद्ध वॉरंट जारी करावं लागेल'; कोर्टाची भुजबळांना तंबी! अडचणी वाढणार?


"ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या आज वाढदिवसानिमित्त त्यांना व्हिडीओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या. त्यांना सुदृढ आणि उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत त्यांचे आदरपूर्वक अभिष्टचिंतन केले," अशा कॅप्शनसहीत मुख्यमंत्री शिंदेंनी अण्णांबरोबर व्हिडीओ कॉलवर संवाद साधतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.



अजित पवारांसंदर्भातील प्रकरणावरील वृत्त फेटाळलं


शिखर बँक घोटाळा क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतल्याचं वृत्त निराधार असल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. आपल्या नावाचा दुरुपयोग केला जात असल्याचा दावाही अण्णा हजारेंनी केला आहे. तसेच या प्रकरणामध्ये आपण कोणतीही याचिका दाखल करणार नसल्याचं म्हटलं आहे. "मला काही माहिती नाही. मी अचानक वर्तमानपत्रात वाचलं. नावाचा दुरुपयोग करुन काही ना काही लोक स्वार्थ साधतात. अशा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका.