जालना : जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास गोरंटयाल हे नाराज झाले आहेत. त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. आज गोरंटयाल यांनी आपल्या समर्थकांची जालन्यात बैठक घेतली. या बैठकीत समर्थकांसह काँग्रेस सदस्य आणि आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आमदार कैलास गोरंटयाल हे आता राजीनामा देणार आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कैलास गोरंटयाल हे काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य पदासह आमदारकीचा राजीनामा काँगेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवणार आहेत. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष देखील सामूहिक राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे सोपवणार आहेत. काँग्रेसने अन्याय केला, अशी प्रतिक्रिया आमदार कैलास गोरंटयाल यांनी दिली आहे.


शिवसेनेचा नाराज आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठोपाठ काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांनीही बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यामुळे महाविकासआघाडीत सध्यातरी बिघाडी दिसून येत आहे. यावरुन भाजपने महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. खातेवाटपाआधीच महाविकास आघाडीतली बिघाडी समोर आली. तीन पक्षाचे सरकार किती दिवस टिकणार आहे. आता त्यांची ही अवस्था तर पुढे काय, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. जे दिलेला शब्द पाळू शकत नाहीत, ते काय राज्याचा कारभार करणार, असा टोलाही भाजपकडून लगावण्यात आला आहे.


दरम्यान,  मंत्रीपद न मिळाल्यानं कैलास गोरंटयाल नाराज झालेत. गोरंटयाल जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. गोरंट्याल समर्थकांची जालन्यात बैठक घेतली. या बैठकीत  ठरल्याप्रमाणे कैलास गोरंटयाल समर्थकांसह राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ते आता आपल्या सदस्य आणि आमदारकीचा राजीनामा देणार याची उत्सुकता आहे.