रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम हे राज्यात भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. आतापर्यंत आलेल्या आकड्यांनुसार, पलूस कडेगाव मतदारसंघातून विश्वजित कदम यांनी १ लाख ६२ हजार ५२१ असं भरघोस मताधिक्य मिळवलं आहे.


निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वांत आश्चर्यकारक बाब म्हणजे विश्वजित कदम यांच्यानंतर दोन क्रमांकाची मतं ही नोटा या पर्यायाला पडली आहेत. यानंतर शिवसेना उमेदवार संजय विभुते यांना तिसऱ्या क्रमांकावर ८ हजार ९७६ मतं मिळाली आहेत.


विश्वजित कदम यांनी पलूस- कडेगाव विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विश्वजित कदम भविष्यात राज्याचे नेतृत्व करतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला होता. विश्वजित कदम हे पतंगराव कदम यांचे चिरंजीव आहेत.