सेलिब्रिटी असूनही कॅन्सरची माहिती लास्ट स्टेजला का कळते? नेमकं कुठे चुकतं?
Hina Khan Breast Cancer : अलीकडेच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या कारणांमुळे सेलिब्रिटी कॅन्सरला बळी पडत आहेत?
कर्करोग हा असा आजार आहे, त्याचे नाव ऐकताच माणसाच्या मनात मृत्यूचे विचार येतात. एक काळ असा होता की, अधूनमधून कोणालातरी कॅन्सर झाल्याची बातमी ऐकायला मिळायची. पण आजच्या बदलत्या जीवनशैलीत हा एक सामान्य आजार झाला आहे. आजच्या काळात कॅन्सरची प्रकरणे रोज समोर येत आहेत. केवळ सामान्य लोकच नाही तर बडे सेलिब्रिटीही या धोकादायक आजाराला बळी पडत आहेत. अलीकडच्या काळात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. त्यापैकी काहींनी कॅन्सरवर यशस्वीपणे मात केली, तर काहींनी आयुष्याची लढाई या आजारामुळे गमावली. अलीकडेच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. हिनाने स्वतः तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे याचा खुलासा केला आहे. तिच्यावर उपचार सुरू झाले असून कर्करोगावर मात करून ती लवकरच परतणार असल्याचे तिने सांगितले.