...म्हणून सानिया मिर्झाने केलेलं शोएब मलिकशी लग्न

टेनिसपटू सानिया मिर्झा आणि मोहम्मद शामी हे साखरपुडा करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.   

Jun 28, 2024, 18:03 PM IST
1/8

सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत विवाह केला होता. मात्र काही वर्षातच त्यांनी घटस्फोट घेतला.   

2/8

सानियाने लग्नानंतर एका रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

3/8

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता शाहरुख खानने केले होते. यावेळी शाहरुखने सानियाला शोएबसोबत लग्न करण्यावरुन एक प्रश्न विचारला होता.   

4/8

'तू शोएबमध्ये असं काय पाहिलंस की, तुला त्याच्याशी लग्न केलं' असा प्रश्न शाहरुखने यावेळी तिला विचारला. यावर तिने फारच थोडक्यात उत्तर दिले.  

5/8

शाहरुखच्या प्रश्नावर सानिया म्हणाली की, 'मी त्याच्यात नक्की काय पाहिलं हे मला माहिती नाही. पण शोएब खूप लाजाळू आणि शांत आहे. त्याला माणसांशी गप्पा मारणं शिकवावं लागेल.

6/8

दरम्यान सानियासोबत घटस्फोट घेतल्यानंतर शोएब मलिक तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला. त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना मलिकसोबत निकाह केला.

7/8

सोशल मीडियावर त्यांच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. यावरुन शोएबला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.  

8/8

शोएबसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता सानिया मिर्झाच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा रंगली आहे. सानिया लवकरच मोहम्मद शमीशी लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप यावर त्या दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.