पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका जाहिरात बद्दल पुण्यात उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत.  पुण्यात 'sex तंत्र' नावानं एक प्रशिक्षण शिबीर भरवण्यात येणार आहे. येत्या 1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात हे शिबीर होणार आहे. त्यासाठी प्रतिव्यक्ती 15000 रुपये शुल्क ठेवण्यात आलंय. या जाहीरातीवरुन सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलंय. (controversy on sex poster in pune social media netizens are angry)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नावरात्रौ स्पेशल या नावाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. असं असलं तरी ही जाहिरात आणि उपक्रम शंकास्पद तसेच बेकायदेशीर असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. लैंगिक तसेच लैंगिकता शिक्षण आवश्यकच आहे. पण या जाहिरातीतून वेगळंच काहीतरी प्रतीत होत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कायदेतज्ज्ञ ऍड असीम सरोदे यांनी केली आहे.  पुण्यात चाललंय तरी काय असा प्रश्न त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर उपस्थित केलाय.