योगेश खरे / नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक दिसून येत आहे. कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना आता मृत्यूंची संख्याही वाढताना दिसत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकमध्ये आता अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कोविड परिस्थितीमुळे वाढलेल्या मृतदेहांचे अंत्यसंस्कारामुळे मनपाने ऑनलाईन अपॉइंटमेंट सुविधेचा निर्णय घेतला.  मृतदेहांचे अंत्यसंस्कार (Funeral) विधीकरीता नागरीकांना होणारा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) वेब अँप्लिकेशन तयार केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 www.cremation.nmc.gov.in  हे अँप्लिकेशन नाशिक महानगरपालिकेच्या e-connect अँप्लिकेशनला  देखील कनेक्ट राहणार आहे. नागरिक या अँप्लिकेशनचा वापर करुन आपल्या नजिकच्या अमरधाम येथील अंत्यसंस्काराबाबतची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतो. मृतांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी पाहिजे त्या विभागातील अमरधाम येथील ऑनलाइन स्लॉट बुक करता येणार आहे.


अंत्यसंस्काराचे स्लॉट बुक झाल्यानंतर  एक मेसेज व त्या ठिकाणी आपण आपली बुकिंग रिसिप्ट सुद्धा डाउनलोड करता येणार आहे. हे अंत्यसंस्कारासाठी बनवलेलं अँप्लिकेशन आजपासून सुरु करण्यात येणार आहे . नाशिक शहरात सर्व विभागात एकूण 27 अमरधाम या अमरधाममध्ये 90 बेड आहेत आणि नागरिकांना या अँप्लिकेशन अंत्यसंस्कारासाठी स्लॉट बुक करण्यात येईल, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.


नाशिक मनपाच्या या अँप्लिकेशनमुळे नागरीकांना  प्रतिक्षा आणि मानसिक त्रास दूर होण्यास मदत होईल, असा दावा पालिकेने केला आहे. या अँप्लिकेशन नजीकचे अमरधाम गूगलच्या माध्यमातून शोधता येणार आहे. मनपाचे अंत्यसंस्कार अँप्लिकेशन नागरिकांसाठी मोफत असणार आहे.