मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात  आज  49 हजार 447 नव्या  रुग्णांची  नोंद झाली आहे.  तर 277 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचं दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कल्याण डोंबिवलीत क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक वाढताना दिसत आहे.  कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज सर्वाधिक 1 हजार 244 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली.  उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 9 हजार 599 आहे. 24 तासात कोरोना बाधित 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.



 मुंबईत मागील २४ तासांमध्ये ९ हजार ९० नवीन करनाबाधित रूग्ण वाढले असून, २७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 62 हजार 187 रूग्णांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत 11 हजार 751 जणांचा मृत्यू झाला आहे. 



चंद्रपूरमध्ये  गेल्या 24 तासात 1 हजार 267 नमुने तपासणीतून 335 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून 24 तासात एका रूग्णांता मृत्यू झाला आहे. जालन्यात 24 तासात कोरोनाच्या 565 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 24 तासात जिल्ह्यात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 27 हजार 932 वर पोहोचली आहे.


नागपुरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. आज नागपुरात  47  जणांचा मृत्यू झाला असून 3 हजार 720 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. शहरात 25 तर ग्रामीणमध्ये 17 आणि  जिल्ह्याबाहेरील 5 मृत्यू झाले आहेत. तर आज 3 हजार 660 रुग्ण झाले कोरोनामुक्त झाले आहेत.