विशाल करोळे, औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एका महिलेला कोरोनो डिटेक्ट झाला, ती महिला आठवडाभर शहरात फिरत होती. त्यामुळं लोक घाबरले आहेत. घाबरणं जरी स्वाभाविक असलं तरी काळजी घेणं हेच आपल्या हातात आहे, हेच सांगण्याचा झी 24 तासचा हा प्रयत्न.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादेतील कोरोना बाधित महिला आठव़डाभर शहरात फिरत होती. कॉलेजमध्ये तीनं क्लासेसही घेतले, आणि यामुळं शहरात भितीचं वातावरण आहे. प्रत्येक जण एकमेकांकडे संशयानं पाहत असल्याचं चित्र आहे. यावरच मात करण्यासाठी सोशल डिस्टन्स पाऴावे असं आवाहन डॉक्टकांनी केलं आहे. सोशल डिस्टन्स म्हणजे, कुणाशी बोलतांना, भेटतांना किमान 1 मीटर दोघांमद्ये अंतर असावे, अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश नको, गर्दीच्या ठिकाणी जावू नये, कार्यक्रमात सहभागी होवू नये आणि गरज असेल तरच घराबाहेर पडावे आणि या माध्यमातून सोशल डिस्टन्स पाळून आपण आपला बचाव करू शकतो. सरकारनं सांगितलेल्या स्वच्छतांच्या नियमांचं पालन करावं असं डॉक्टरांच मत आहे.


हात स्वच्छ धुतांना आपले गँझेट्सही साफ करावे असाही सल्ला डॉक्टर देत आहेत. स्टीलच्या भांड्यावर, कागदी पुठ्ठ्यांवर हा व्हायरस दिवसभर जिवंत राहतो. तर मोबाईलच्या स्क्रीनवर हा व्हायरल 4 दिवसं जिवंत राहू शकतो. त्यामुळं मोबाईल, कॉम्प्युटर की-बोर्ड हे सॅनिटायझरनं साफ करणं गरजेचं असल्याचं सल्ला तज्ञ देत आहेत.


कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळं काळजी घेणं हेच आपल्या हातात आहे. त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि नियमांचे पालन केल्यास निश्चितपणे कोरोनापासून दूर राहू शकता.