Pradeep Kurulkar Honey Trap Case : पुण्यातील डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर याची पॉलिग्राफ चाचणी करण्याचा निर्णय एटीएसने घेतला होता. कारण हनी ट्रॅपसाठी वायुदलातील शिपाई निखील शेंडे याच्या मोबाईला वापर केल्याचा संशय आहेत. दरम्यान, प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफी चाचणी करण्याची मागणी एटीएसने न्यायालयाकडे केली होती. आता पॉलिग्राफी चाचणीसाठी न्यायलायाकडून रितसर परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अधिक माहिती उजेडात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुणे डीआरडीओतील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हा पाकिस्तानच्या हनी ट्रॅप प्रकणात अडकला. त्याने अनेक संरक्षक दलाची माहिती लिक केली होती. काही फोटोही काढले होते, असे पुढे आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.


हनी ट्रॅपसाठी दुसऱ्याच्या मोबाईलचा वापर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील डीआरडीओ संचालक प्रदीप कुरुलकर याची हनी ट्रॅपप्रकरणी पॉलिग्राफी चाचणी होणार आहे. एटीएसने पॉलिग्राफी चाचणीसाठी कोर्टात अहवाल सादर केला. त्यानंतर न्यायालयाने परवानगी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुरुलकरला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी ज्या मोबाईल नंबरचा वापर करण्यात आला तो वायुदलातील शिपाई निखिल शेंडे असल्याचं समोर आले आहे.  तो सध्या बंगळुरुमध्ये आहे.  


पॉलीग्रॉफी चाचणीसाठी न्यायालयाची परवानगी


डीआरडीओचे संचालक कुरुलकर चौकशीत सहकार्य करत नाही. त्यामुळे त्याची पॉलिग्राफी टेस्ट करण्याचा निर्णय एटीएसने घेतला आहे. एटीएसला टेस्ट करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मिळाली असल्याची माहिती मिळाली आहे. पॉलिग्राफी टेस्टमध्ये माहिती मिळाली नाही तर नार्को टेस्ट ही केली जाऊ शकते, अशी शक्यता आहे.



पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेला कुरुलकर याला मोहजालात अडकवण्यासाठी ज्या मोबाईल क्रमांकावरुन संपर्क करण्यात आला तो वायुदलातील शिपाई निखिल शेंडे याचा असल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास करण्यात येणार आहे. 


पाकिस्तानच्या हनीट्रॅप जाळ्यात अडकल्यानंतर कुरुलकर याने संरक्षण दलाची महत्त्वाची माहिती दिल्याची बाब पुढे आली आहे. तसेच संरक्षण दलाची गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंट यांना पुरविल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महासंचालकांच्या परवानगीने एटीएसकडे गुन्हा दाखल केला होता. त्यांने काही फोटोही पाठवले होते, अशीही माहिती समोर आली आहे.  कुरुलकर चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक नव्हे, तर चार चार मोबाईल वापरत होता. त्याच्या मोबाइलमध्ये महिलांचे फोटो आहेत. आता तर एका शिपायाचा फोनचा वापर केल्याचे पुढे आल्याने त्या दिशेने एटीएस तपास करणार आहे.


पॉलिग्राफ चाचणी म्हणजे नक्की काय?


Polygraph Test : आजच्या युगात जितके गुन्हे वाढत आहेत, तितके तंत्रज्ञानही विकसित होत आहे. बर्‍याच प्रकरणांमध्ये गुन्हेगार खूप हुशार निघतो आणि अशा परिस्थितीत गुन्हा केलेल्या व्यक्तीला शिक्षा करणे कठीण असते. त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट केली जाते.


पॉलिग्राफ चाचणीसाठी एका मशीनचा वापर केला जातो. पॉलिग्राफ मशीनद्वारे आरोपीचे खोटे पकडले जाते. मोठ्या गुन्ह्यात सामील असलेल्या व्यक्तीविरुद्ध पुरावे तयार करण्यासाठी पॉलिग्राफ चाचणी खूप उपयुक्त आहे. या चाचणीत आरोपीच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि मेंदूतील सिग्नलमध्ये बदल दिसून येतो.