नागपूर: कोरोनाच्या तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असताना नागपुरात  24 तासात 18 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.उपराजधानीत सलग तिस-या दिवशी दुहेरी आकड्यात कोरोनाबाधित वाढल्यानं चिंता वाढली आहे.महत्वाचं म्हणजे वानाडोंगरी येथील एका वैद्यकीत महाविद्यालयाच्या 11 एबीबीएस विद्यार्थ्यांना कोरोना संक्रमण झाले आहे. या विद्यार्थ्यांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या, दुसर्‍या लाटेचे थैमान बघितल्यानंतर आता उपराजधानी तिसरी लाटेच्या  उंबरठय़ावर असल्यानं एक दिवस अगोदर पालकमंत्री डॉ. नितीन राऊतांनी सांगितलं होतं.  आता नागपुरात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या वाढीचा चढता आलेख दिसत आहे. गेल्या तिन दिवसांत बाधितांचा आकडा दुहेरीत येत आहे .मंगळवारी दिवसभरात जिल्हय़ात एकूण 18 बाधितांची भर पडली. यात ग्रामीण भागातील 10 तर शहरातील 8 रुग्णांचा समावेश आहे.कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना रुग्णसंख्येत कमालीची घट बघायला मिळाली होती. अगदी एका दिवसाला 8 हजार बाधितांचा उच्चांक गाठल्यानंतर ही रुग्णसंख्या ग्रामीण भागात शून्य तर शहरात 1 एवढी पोहचली होती. या दरम्यान, नियमांचे पालन करा या अटीवर निर्बंधातही शिथिलता देण्यात आली होती. मात्र आता 24 तासांत बाधितांची संख्या 18 वर पोहचली. त्यामुळं हे तिस-या लाटेचे संकेत असल्याचं तज्ज्ञ सांगताय. जिल्हय़ात मंगळवारी 4534 चाचण्या करण्यात आल्या. यात 4516चाचण्या निगेटिव्ह तर 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. आतापर्यंत जिल्हय़ात एकूण बाधितांची संख्या 4 लाख 93 हजार 090 वर पोहोचली


दोन लसमात्रा घेतलेल्यांना बाधा


वानाडोंगरी येथील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएसच्या 11 विद्यार्थ्यांना कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी दोन लसीमात्रा घेतल्या होत्या. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 82 विद्यार्थ्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.