मयूर निकम, झी मीडिया, देऊळगाव: सध्या चोरीच्या घटना (Thief) आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतात. कोण कधी आपली काय गोष्ट चोरी करेल याचा काही थांगपत्ता नाही. आजकाल पैसे, सोनं, चांदी (Gold and Sliver) तर सोडा हल्ली सामान्य वस्तूही चोरीला जात आहेत. कधी लॅपटॉप (Laptop) चोरण्याची घटना असते तर कधी घरातील चादऱ्याही चोरीला जातात. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार देऊळगाव या ठिकाणी घडला आहे. या पठ्ठ्यानं तर चोरी करण्यासाठी चक्क गाडीच चोरी केली आणि ही कोणती साधीसुधी गाडी नसून ती लालपरी म्हणजेच एसटी बस आहे. (crime news today a man steals st bus while the workers were sleepings)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास देऊळगाव राजा बस स्थानकात बस उभी करून चालक व वाहक विश्रांती कक्षात झोपलेले असताना MH 07 C 9273 क्रमांकाची मानव विकास मिशनची बस (Bus) अज्ञाताने बस स्टँड आवारातून गायब केली अशी तक्रार या एसटी बसच्या चालकाने देऊळगाव राजा पोलिसात (Police) दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. 


हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल



मात्र सदर बस अज्ञाताने सुरू करून चिखली मार्गाने जाताना बस स्थानकापासून दोन किलोमीटर वर एका गतिरोधकावर बसचा सेंट्रल जॉईंट निखळल्याने नादुरुस्त अवस्थेत बस रस्त्यात उभी करून पोबारा केला आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन हे प्रकरण चौकशीवर ठेवलं आहे. मात्र या बाबतीत एसटी (St Workers) कर्मचारी व पोलीस काहीही माहिती देण्यास तयार नाहीत. (St Workers Strike)


हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा


जगातील सर्वात मोठी मांजर पुण्यात ! : 


पुण्यात हा सर्वात भव्य दिव्य पाळीव प्राणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे .पेटगाला हा पाळीव (Pets) प्राणी प्रेमींचा एक आकर्षक मेळावा आहे. या शोमध्ये चॅम्पियनशिप कॅट शोचे परीक्षण करणार आहेत. 200 हून अधिक मांजरींचा (Cats) सहभाग असल्याची माहिती FCI चे अध्यक्ष साकिब पठाण यांनी दिली. पर्शियन, मेन कून, बंगाल आणि आमची स्वतःची इंडीमाऊ यांसारख्या विविध जाती यात आहेत. इव्हेंटमध्ये पाळीव प्राण्यांच्या (Cats Funny Videos) मनोरंजनासाठी काही खास मज्जा मस्ती ही अनुभवायला मिळत आहे, जसे की डॉग रनिंग गेम्स, पूल पार्टी, पेट फॅशन शो, इतर खेळ इत्यादी उपक्रम राबविण्यात आलेत . या मेळावा मध्ये सर्वात मोठी मांजर पुणेकरांना पाहायला मिळत आहे.