नाशिक: गेल्या काही काळापासून नाशिकमध्ये गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण लक्षात घेता आंतरराज्यीय गुन्हेगारांची टोळी सक्रिय असल्याचं स्पष्ट झालंय... विविध गुन्हेगारीच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग वाढल्याचं समोर आलंय. पोलिसांनी या गुन्हेगारांवर धडक कारवाई केली. मात्र गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण पहाता पोलिसांचा वचक कमी होत असल्याचं स्पष्ट होतंय.


सोशल मीडियातूनही नाशिकरांना गंडा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सोशल मीडियातूनही गंडा घालणाऱ्या टोळ्यांनी नाशिकमध्ये डोके वर काढले आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर प्रत्येकजण सक्रिय सहभागी होऊ लागलाय. मात्र, याच सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आपला आर्थिक हित साधत आहेत. एक आंतरराष्ट्रीय टोळी भारतात सक्रिय होऊ लागलीय. बीटकॉईन स्वरुपात पैसे जमा करा नाहीतर, अश्लील व्हिडिओ तुमच्या फेसबूकवर उपलोड करू, अशी धमकी ते देत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आलाय.



अलीकडच्या सहा महिन्यात नाशिकमध्ये GFX IN घरफोडी प्रकरणी ६, एमडी ड्रग्ज प्रकरणी ५, गाजा तस्करी प्रकरणी २, दुचाकी चोरीप्रकरणी ६, सोनसाखळी चोरीप्रकरणी ६, मोबाईल चोरीप्रकरणी - २ GFX OUT अशा एकूण २७ आंतरराज्यीय गुन्हेगारांना जेरबंद करण्यात नाशिक पोलिसांना यश आलंय.. नियम धाब्यावर बसवून घरमालक अशा लोकांना आश्रय देत आहेत. दरम्यान, भाडेकरुंबाबत विशिष्ट नमुन्यात माहिती भरुन देणं स्थानिकांना बंधनकारक आहे.. मात्र तसं होत नाही.. स्थानिक पोलिसही त्याकडे कानाडोळा करतात असा आरोप तज्ज्ञांनी केलाय.. गुन्हा करायचा आणि आपल्या राज्यात पळून जायचं अशी पद्धत वापरून अनेक गुन्हेगार पोलिसांच्या तावडीतून पळालेत.. तर काही गुन्हेगार हे परराज्यात गुन्हे करुन नाशिकमध्ये वास्तव्यास आल्याचंही उघड झालंय... त्यामुळे नागरिकांनी दक्ष रहाणं गरजेचं आहे..