रायगड: दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी मिनीबसमधून सहलीसाठी मोठ्या आनंदाने आणि उत्साहात निघाले. सकाळी सातच्या सुमारास निघालेल्या या कर्मचाऱ्यांनी खेडमध्ये नाश्ता केला आणि फोटोसेशनही झालं. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. महाबळेश्वरच्या दिशेने जात असताना क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मातीच्या ढिगाऱ्यावरुन बस घसरली आणि थेट ३०० मीटर खोल दरी कोसळली. अपघाताची माहिती कळताच मदत आणि बचावकार्याला सुरूवात झाली पण, या घटनेत सुमारे ३३ जणांचा मृत्यू झाला. या धक्कादायक अपघाताबाबत आतापर्यंतच्या महत्त्वपूर्ण घडामोडी.


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    दुर्घटनेनंतर पोलीस, महाबळेश्वर आणि ट्रेकर्स तसंच पुण्यातील एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं. स्थानिक आणि गिर्यारोहकांच्या मदतीने दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र दाट धुक्यामुळे बचावकार्यात अडचणी आल्या. 

  • दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनीबसला आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ३३ जणांचा मृत्यू झालाय. २० जणांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले.

  • आंबेनळी दुर्घटनेची चौकशी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय. तर दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून ४ लाख रुपये मदतीची घोषणा करण्यात आलीय. 

  • दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या आंबेनळी घाटातल्या या दुर्घटनेमुळे दापोली कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांची ही पिकनिक मृत्यूची पिकनिक ठरली