पुणे : ब्रेन कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या तरूणाच्या जतन केलेल्या शुक्राणूंमुळे त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा अपत्यप्राप्ती झालीय. 


कॅन्सरमुळे झाला होता मृत्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जतन केलेले शुक्राणू आणि सरोगेट मदरच्या माध्यमातून जुळ्या बाळांचा जन्म झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचं डॉक्टर्सनी सांगितलंय. २५ वर्षीय प्रथमेश पाटील जर्मनीमध्ये एमएस करत होता. त्याचवेळी त्याच्या मेंदूमध्ये कॅन्सरची गाठ असल्याचं निदान झालं. मात्र तीन वर्षांच्या ट्रीटमेंट नंतर त्याचा मृत्यू झाला.


जर्मनीत जतन केले शुक्राणू


नियमानुसार कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू करण्याआधी प्रथमेशचे शुक्राणू जर्मनीमध्ये जतन करून ठेवण्यात आले होते. त्यामुळे टेस्ट ट्यूब बेबीद्वारे प्रथमेशच्या अपत्याला जन्म देता येईल का असा विचार प्रथमेशची आई जयश्री पाटील यांच्या मनात आला. त्यानुसार त्यांनी सह्याद्री हॉस्पिटलमधील डॉक्टर्स ची संपर्क साधला. 


नात्यातील महिलेचा सरोगसीसाठी होकार


प्रथमेशचं लग्न झालेलं नसल्यानं बाळाच्या जन्मासाठी एग डोनर पासून आणि सरोगेट मदर शोधणं हे आव्हानात्मक होत. मात्र, जयश्री पाटील यांच्या नात्यातील एका महिलेनं सरोगसीसाठी होकार दिल्या नंतर तिच्या गर्भात हे बाळ वाढविण्यात आलं आणि नुकतंच या महिलेनं जुळ्यांना जन्म दिला. ज्यामुळे प्रथमेश परत आल्याची भावना त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलीये.