अंबरनाथ : अंबरनाथ येथील वादग्रस्त गार्डियन डेंटल कॉलेजच्या तब्बल १२० विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय. या डेंटल कॉलेजची मान्यता महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक यांनी रद्द केलीय. 


कागदपत्रं विद्यापीठाला पाठवणं गरजेचं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे 2013-14 आणि 2014-15 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी गार्डियन कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांची कागदपत्रं विद्यापीठाला पाठवणं गरजेचं असतं. 


कागदपत्र देण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस


मात्र ते कॉलेज करत नसल्याचा विद्यार्थी आणि पालकांचा आरोप आहे. ही कागदपत्र सबमिट करण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झालेत. 


विद्यार्थी २ दिवसांपासून कॉलेजसमोर ठाणमांडून


कागदपत्रांसाठी वारंवार फेऱ्या मारुनही कुणीच दाद देत नसल्याचा आरोप आता होतोय. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून दिवस रात्र विद्यार्थी आणि पालक कॉलेज समोर ठाणमांडून आहेत.


33 विद्यार्थी हे जम्मू काश्मीरचे 


विशेष म्हणजे या विद्यार्थ्यामध्ये 33 विद्यार्थी हे जम्मू काश्मीर इथले आहेत. विशेष म्हणजे या कॉलेजचे बांधकाम हे  अनधिकृत असल्याने अंबरनाथ पालिका कधीही ते जमीनदोस्त करणार आहे.