Ajit Pawar Infected with Dengue: उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित नसल्याच्या चर्चा माध्यमांतून समोर येत आहेत. यावर अजित पवार नाराज असल्याचा सूर लावला जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कालपासून अजित पवार यांना डेंग्यूचे निदान झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेंग्युची लागण झाल्याने अजित पवार यांना पुढील काही दिवस वैद्यकीय मार्गदर्शन आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. एकदा ते पूर्णपणे बरा झाले की, सार्वजनिक कर्तव्ये पुढे चालू ठेवतील असेही त्यांनी स्पष्ट केले. 


अजित पवारांना गावबंदी



मराठा आंदोलनाची झळ राजकीय नेत्यांना बसू लागली आहे. मराठा कार्यकर केलेल्या गावबंदीमुळं राज्यभरातले नेते हैराण झाले आहेत. मराठा आरक्षणाची झळ उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसलीय. अजित पवारांना बारामतीतच गावबंदी करण्यात आलीय. मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत तोडफोड सुरू केलीय. माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला अजित पवारांचं न जाणं योग्यच अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिलीय. तर बारामती अजित पवारांवर भरपूर प्रेम करतात. मात्र जनभावनेचा आदर करावा लागतो असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं. 


भावी मुख्यमंत्री 


मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीसांच्या व्हिडिओनंतर आता अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. पुण्यात अजित पवार समर्थक कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेत. विकासाचा वादा, अजितदादा! भावी मुख्यमंत्री असा उल्लेख या बॅनरवर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओ ट्विटनंतर अजित पवार समर्थकांनी ही पोस्टरबाजी केली आहे.