अहमदनगर : जागेच्या वादातून एका कुटुंबाला अमानुष मारहाण झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील राशीन इथं घडलीय. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमल काळे आणि सचिन काळे यांच्या मालकीची राशीन इथं जमीन आहे. २ ऑगस्टला या जागेत गाळ्याचे बांधकाम चालू असताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संभाजी राजेभोसले, त्यांचा मुलगा राहुल राजेभोसले, नितीन राजेभोसले यांच्यासह २० ते २५ जण तिथे आले. त्यांनी या जागेवर हक्क सांगत बांधकाम तोडण्याचा प्रयत्न केला. काळे कुटुंबीयांनी याला विरोध केला. त्यामुळं संतप्त राजेभोसले आणि त्याच्या साथीदारांनी काळे कुटुंबीयांना लाठ्या काठ्या, गज आणि तलवारीने मारहाण केली. 


या मारहाणीत सचिन काळे आणि कमल काळे हे गंभीर जखमी झालेत. त्यांना नगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कमल काळे यांच्या फिर्यादीवरुन संभाजी राजेभोसले यांच्यासह २१  जणांवर कर्जत पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र गुन्हा दाखल होऊन ८ दिवस उलटल्यानंतरही आरोपी मोकाटच आहेत.