प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई: हल्ली सगळीकडे बस, गाड्या बेभान चालविणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. यावेळी मात्र गाड्या चालवताना बस ड्रायव्हरचं (Drivers) भान सुटलं आहे. झुकेगा नहीं साला असा पुष्पाचा डायलॉग (Pushpa) तुम्ही ऐकलाच असेल परंतु सध्या व्हायरल होणाऱ्या या एका व्हिडीओत (Video) पुष्पासारखी एका बाजूला झुकणारी बस पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरता येणार नाही. या बसमध्ये प्रवासी एका बाजूला इतके कलडलेले दिसले की हा व्हिडीओ पाहून पुष्पाची आठवण आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. या व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे. ही घटना वसई परिसरातली आहे. (due to heavy load bus running on side like pushpa style on vasai virar road)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एका बाजूलाच प्रवाशी अधिक लटकलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ अधिक हास्यापद (Funny Video) वाटतो आहे. क्षमतेपेक्षाही अधिक प्रवाशांनी बसचा तोल एका बाजूला करून ठेवला होता त्यामुळे हा प्रकार घडला. 


हेही वाचा - Eknath Shinde: शिंदे सरकार राणेंवर मेहरबान! कणकवलीला दिलं भरभरून...


अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा चित्रपटातील मधील पुष्पाच्या वन साईड चालीने सर्वांचीच मने वळवली होती. याच पुष्पाची चाल सध्या वसई विरार महापालिकेच्या परिवहन ताफ्यातील बसने घेतली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी व बसच्या झालेल्या दुरावस्थेमुळे पालिकेच्या ताफ्यातील ही बस एका साईडला झुकली आहे व याच अवस्थेत ही बस रस्त्यांवर चालवली जातं आहे.



धोकादायक अवस्थेत असलेल्या या बसकडे रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधले जात होते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूकीमुळे पालिकेच्या (Municipal Corporation) ताफयातील अनेक खिळखिळ्या होतं चालल्या असून त्या अपघाताला आमंत्रण देत आहेत. सध्या अशा प्रकारच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षितेतचा (Security) प्रश्न उभा राहिला आहे. अशा घटनांवर वेळी उपाय करणं आवश्यक आहे.