Devendra Fadanvis On covid Cases : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं चित्र समोर आलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील याचा फैलाव (Maharastra Covid 19 Cases) होताना दिसतोय. अशातच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता राज्याच्या आरोग्ययंत्रणा सतर्क झाल्याचं पहायला मिळतंय. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात (Pune News) यावर माहिती देत राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले Devendra Fadanvis?


मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काय काय काळजी घेतली पाहिजे, याच्या सुचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत. पण अपेक्षा करूया की, याचा प्रादुर्भाव वाढणार नाही. गेल्या काही वर्षात लोकांना अनुभव आला आहे, जनतेने याचा त्रास झाला आहे. त्यामुळे आता कसं वागायचं याबाबत लोकांना माहिती आहे. सार्वजनिक ठिकाणी नाताळ असो वा नवीन वर्ष, लोकांनी काळजी घ्यावी, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 


महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे 50 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 9JN.1 व्हेरिएंटचा समावेश आहे. देशात 21 डिसेंबरपर्यंत JN.1 व्हेरिएंटचे एकूण 22 रुग्ण सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात जे नवे रुग्ण सापडले आहेत ज्यामध्ये जवळपास 5 पैकी 1 रुग्ण नव्या व्हेरिएंट JN.1 चे आहे. अशावेळी महाराष्ट्र Covid च्या नव्या व्हेरिएंटचे सुपर स्प्रेडर तर ठरत नाही ना?, असा सवाल विचारला जातोय.


आणखी वाचा - Covid च्या नव्या व्हेरिएंटचा सुपर स्प्रेडर बनतोय महाराष्ट्र? व्हेंटिलेटर-ऑक्सिजन सिलिंडर तयार ठेवण्याचे आदेश


दरम्यान, JN.1 चे व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सरकारने आरोग्य अधिकाऱ्यांना सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर आणि अन्य आवश्यक उपकरणांची सुविधा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.  केंद्र सरकारने राज्यांना व्हायरसच्या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सर्व नमुने पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.