जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना त्यांच्या राजकीय जीवनातला हा सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल. कारण एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रकांत पाटील हे याआधी शिवसेनेत होते, विधानसभा २०१४ मध्ये देखील एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात १० हजारांचं अंतर होतं. अखेर चंद्रकांत पाटील यांनी यावेळेस रोहिणी खडसे यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्रभैय्या यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चंद्रकांत पाटील यांना मोठी मदत झाली आहे.


एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल, कारण भाजपने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारून रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. तरी देखील मोठ्या मनाने एकनाथ खडसे यांनी ही उमेदवारी स्वीकारली होती.


रोहिणी खडसे यांचा पराभव झाल्यानंतर खडसे परिवाराचं कुणीही विधानसभेत एवढ्या वर्षांनी कुणीही दिसणार नाहीय. एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे सध्या रावेर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.



तुमच्या भागाचा निकाल पाहा एकाच क्लिकवर


LIVE निकाल महाराष्ट्राचा : मुंबई


LIVE निकाल महाराष्ट्राचा : कोकण


LIVE निकाल महाराष्ट्राचा : मराठवाडा 


LIVE निकाल महाराष्ट्राचा : विदर्भ


LIVE निकाल महाराष्ट्राचा : पश्चिम महाराष्ट्र


LIVE निकाल महाराष्ट्राचा : उत्तर महाराष्ट्र