Vidhan Parishad Election: लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय घमासान पाहायला मिळणार आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विधानसभा सदस्यांकडून विधान परिषद सदस्यांना निवडून देण्यात येते. त्या 11 जागांची निवडणूक आयोगातून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 


यांचा कार्यकाळ संपणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. मनिषा कायंदे, अब्दुल्ला खान दुर्रानी, निलय नाईक, एड. अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, वझाहत मिर्झा, प्रज्ञा सातव, महादेव जानकर, जयंत पाटील यांचा कार्यकाळ 27 जुलै 2024 रोजी संपणार आहे. 


 25 जून रोजी नोटिफिकेशन


निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार विधान परिषद निवडणुकीसाठी 25 जून रोजी नोटिफिकेशन काढण्यात येणार आहे. 2 जुलैपर्यंत नॉमिनेशन भरता येणार आहे. 3 जुलै रोजी स्क्रूटीनीटी होणार आहे. 5 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.


 2 जुलै पर्यंत अर्ज भरण्याची मुदत


विधानसभा सदस्या कडून विधान परिषद सदस्यांना निवडून द्यायच्या अकरा जागांची निवडणूक आयोगातून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 25 जून पासून 2 जुलै पर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. 5 जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. 


12 जुलै रोजी रोजी मतदान


12 जुलै रोजी रोजी यासाठी मतदान होणार आहे.  सकाळी 9 ते संध्याकाळी चार या वेळेत पार पडणार मतदान होणार असून 12 जुलै रोजीच संध्याकाळी मतमोजणी होणार आहे.