Maharashtra Exit Poll Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्याआधी विविध संस्थाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. एनडीए की 'इंडिया'? कोण पंतप्रधान होणार? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला 4 तारखेला मिळतीलच. दरम्यान महाराष्ट्रातील निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या जास्त लोकसभा जागा असलेला महाराष्ट्र निर्णायक ठरणार आहे. येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये उभी फूट पडली. दोन्हीकडचा एक गट भाजपसोबत जाऊन सत्तेत बसला. दरम्यान असली शिवसेना आणि नकली शिवसेना तसेच असली राष्ट्रवादी आणि नकली राष्ट्रवादी हा मुद्दा रंगला. पण मतदारांनी कोणाच्या बाजुने कौल दिलाय हे महत्वाचे आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार कोणाचे पारडे जड आहे हे पाहुया. 


रिपब्लिक मॅट्रीजच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात ठाकरे गटाला 9 जागा तर शिंदे गटाला 4 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला 7 तर अजित पवार गटाला 1 जागा मिळेल.


इंडिया टीव्हीच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ठाकरे गटाला 11 जागा तर शिंदे गटाला 6 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला 5 तर अजित पवार गटाला 1 जागा मिळेल.


एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणी मारली बाजी?


एबीच्या सर्व्हेनुसार ठाकरे गटाला 9 जागा तर शिंदे गटाला 6 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला  तर अजित पवार गटाला 


टीव्ही 9 पोलस्ट्रेट सर्व्हेनुसार ठाकरे गटाला 14 जागा तर शिंदे गटाला 4 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला 6 तर अजित पवार गटाला शुन्य जागा मिळेल.


न्यूज 18 च्या सर्व्हेनुसार ठाकरे गटाला 7 जागा तर शिंदे गटाला 7 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला 4  तर अजित पवार गटाला 2 जागा मिळतील. 


एकूण एक्झिट पोल पाहिले असता महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गट आघाडीवर दिसत आहेत. तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गट पिछाडीवर दिसत आहेत.