Exit Poll Mumbai Lok Sabha Election 2024: मुंबई लोकसभा निवडणूक एक्झिट पोल समोर आले आहेत. मुंबईच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. येथे 6 लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक झाली. मुंबईतल्या सहा मतदारसंघात एकूण 96 लाख 53 हजार 100 मतदार आहेत. त्यापैकी मराठी मतांची संख्या 36 लाख 30 हजार 600 इतकी आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ही मते निर्णायक ठरतील.
गुजराती अधिक राजस्थानी मतं 14 लाख 58 हजार 800 इतकी आहेत. ही मत भाजपच्या बाजुने जाणार का हे स्पष्ट होणार आहे. मुस्लिम मतदार 17 लाख 87 हजार इतकी आहेत. उत्तर भारतीय मतदारांची संख्या 16 लाख 11 हजार 400 आणि दक्षिण भारतीय मतदार 6 लाख 97 हजार 600 च्या घरात आहेत. या मतदारांनी उद्धव ठाकरेंना पाठींबा दिलाय का? हे देखील स्पष्ट होणार आहे.
टीव्ही 9 -पोलस्ट्रॅटनुसार उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत तर उज्जवल निकम पिछाडीवर आहेत.
उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तिकर आघाडीवर आहेत तर रवींद्र वायकर पिछाडीवर आहेत.
दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई लढत होतेय. यात राहुल शेवाळे आघाडीवर दिसत आहेत.
उत्तर पूर्व मुंबई भाजपचे मिहिर कोटेजा विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय दिना पाटील अशी लढत आहे. यामध्ये संजय दिना पाटील हे बाजी मारतील असा अंदाज आहे.
उत्तर पश्चिम मुंबईमध्ये ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रविंद्र वायकर असा सामना आहे. यामध्ये अमोल किर्तीकर बाजी मारतील असा अंदाज आहे.
उत्तर मध्य मुंबईत कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपचे उज्वल निकम असा सामना आहे. यामध्ये वर्षा गायकवाड बाजी मारण्याचा अंदाज एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आला आहे.
(Desclaimer: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व 7 टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले असून 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. त्याआधी, ZEE 24 Taas ने आपल्या दर्शकांसाठी एक मेगा एक्झिट पोल आणला आहे. या मेगा एक्झिट पोलमध्ये आम्ही देशातील अनेक मोठ्या एजन्सीचे एक्झिट पोल डेटा दाखवणार आहोत. दरम्यान झी 24 तास जी आकडेवारी दाखवेल ती वेगवेगळ्या एजन्सींच्या सर्वेक्षणातून मिळवलेली आकडेवारी आहे. ज्यासाठी ZEE NEWS जबाबदार नाही. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नाहीत, फक्त एक्झिट पोल आहेत.)