Maharashtra Samruddhi Mahamarg : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं  (Samruddhi Express Way) रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. त्यानंतर सलग दोन दिवसात अपघाताच्या दोन घटना घडल्या. आज तर विचित्रच घटना समोर आली. समृद्धी महामार्गावर एका तरुणाने चक्क गोळीबार केला. याप्रकरणी व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे त्या व्हिडिओत?
छत्रपती संभाजी नगरात (Chatrapati Sambhaji Nagar) समृद्धी महामार्गावर तरुणाने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडिआवर रिल्स बनवण्याच्या उद्देशाने या तरुणाने व्हिडिओ बनवला. शहरजवळ असलेल्या समृद्धीच्या बोगद्याजवळ हा व्हिडिओ बनवण्यात आला. तरुणाने बोगद्याजवळ चार चाकी गाडी उभी केली. त्यानंतर हातात बंदूक घेऊन तो गाडीतून बाहेर आला आणि गाडीसमोर उभं रहात त्याने हवेत गोळीबार केला. सोशल मीडियावर हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. 


तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
समृद्धी महामार्गावर हवेत गोळीबार करणाऱ्या तरुणाचं नाव बाळू गायकवाड असल्याचं समोर आलं आहे. बाळू गायकवाडविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 390/2022, 3/25  शस्त्र अधिनियम 1959 नुसार गुन्हा दाखल झालाय. संबंधित तरुणावर याआधी देखील काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.


शिर्डी इंटरचेंजवर ब्रिजखाली अडकला ट्रक
त्याआधी काल नगर मनमाड महामार्गावर शिर्डी इंटरचेंजवर (Shirdi Interchange) समृद्धी महामार्गाच्या ब्रिजखाली एक अवजड वाहन अडकलं होतं.  समृद्धी महामार्गाच्या ब्रिजची उंची कमी आहे. त्यामुळे नगर मनमाड महामार्गावरील शिर्डी इंटरचेंजजवळ चेन्नईहून ऑईल रिफायनरीचे मशीन घेउन धुळ्याच्या दिशेने जात असलेला ट्रक ट्रेलर ब्रिजखाली अडकला. त्यामुळे ट्रक चालकाला मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागंल. रोडचं काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना चालकांनी संपर्क केला असता त्यांनीही प्रतिसाद दिला नसल्याचे ट्रक चालक मोहम्मद अली याचं म्हणणं आहे. 


हे ही वाचा : Tiktok Star संतोष मुंडेच्या मृत्यूचं धक्कादायक कारण, मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबाचा नकार


सोमवारी कारचा अपघात
समृद्धी महामार्गावर सोमवारी पहिल्या अपघाताची नोंद झाली, सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसून दोन्ही कारचे मात्र मोठे नुकसान झालं आहे. वायफळ टोल नाक्यावर स्लो स्पीडने जाणाऱ्या एका कारला मागून वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. कालच समृद्धी महामार्गाचा वायफळ टोल नाक्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटन केलं होतं, उद्घानाला 24 तास उलटत नाहीत तोच त्याच ठिकाणी अपघात झाला.