Nagpur Crime News : देशभरासह मुंबई  विमानतळावर ड्रग्जची तस्करी होत असल्याची अनेक प्रकरणे सोमर आली आहेत. मात्र, पहिल्यांदाच महाराष्ट्रातील नागपूर विमानतळावर मोठा ड्रग्ज साठा हस्तगत करण्यात आला आहे.  24 कोटी रुपये किंमतीचा हा ड्रग्ज साठा आहे. या कारवाईमुळे ड्रग्जचे मोठे रॅकट उघडकीस होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स म्हणजेच DRI च्या अधिकाऱ्यानी नागपूर विमानतळावर मोठी कारवाई केली. तीन किलो पेक्षा जास्त एम्फेटामाईन हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. तस्कराने एम्फेटामाईन नैरोबी वरून शारजा मार्गे एका मेटल मध्ये लपवून सुटकेस मध्ये घेऊन आला होता.


नागपूर विमानतळावर सोमवारी पहाटे त्याला डीआरआयचे अधिकाऱ्यांनी थांबवले. त्याच्याकडील साहित्याची कसून चौकशी केली असता त्यामध्ये जाड लोखंड असलेल्या मेटलमध्ये आढळून आले. त्याच्या आतमध्ये तीन किलो पेक्षा जास्त एम्फेटामाईन लपवण्यात आले होते. डी आर आय च्या अधिकाऱ्यांनी संबंधित प्रवाशाला ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा सुरुवातीला त्याने उडवाउडवी ची उत्तरे दिली. त्यांनी कसून चौकशी केली असता मोटर पंपच्या आतून अंमली पदार्थ निघाले. यानंतर संबंधित प्रवाशाने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी तत्काळ त्याला अटक केली. आरोपीचे नाव तसेच त्याची अधित माहिती समोल आलेली नाही. पोलिस त्याची अधिक चौकशी करत आहेत. 


दरम्यान याच प्रकरणी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीमध्ये सुभाष नगर परिसरातून एका नायजेरियन नागरिकालाही अटक केली आहे. त्याचीही चौकशी केली जात आहे. नागपूर सारख्या विमानतळावरून 24 कोटी रुपयांच्या अमली पदार्थाची तस्करीचे हे पहिलेच प्रकरण आहे.


अंतर्वस्त्रात सोनं लपवून तस्करी करणाऱ्याला नागपूर विमानतळावर अटक


नागपूर विमानतळावर महसूल गुप्तचर विभागानं मोठी कारवाई केली. शारजाहहून येणाऱ्या विमान प्रवाशाकडून 734.50 ग्राम सोनं जप्त करण्यात आलंय. या प्रवाशानं 35 लाख रुपयांचं सोनं अंतर्वस्त्रात लपवलं होतं. एअर अरेबियाच्या विमानातून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती DRI ला मिळाली होती. त्यानुसार DRIच्या टीमनं सापळा रचून प्रवाशावर कारवाई केली यापूर्वी देखील नागपूर विमानतळावर एक कोटी 80 लाख रुपयांचं सोनं जप्त करण्यात आले होते. केंद्रीय सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केलीय. दोहातून आलेल्या प्रवाशानं 3.36 किलोग्राम सोनं जीन्स पॅन्टच्या आतील भागात स्टीच करून लपवून ठेवले होते.