प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया: आपल्या पृथ्वीवर जैवविविधतेची (biodiversity) नांदी पाहायला मिळते मग ती प्राण्यांमध्ये असो, वनस्पतींमध्ये नाहीतर पक्षांमध्ये. पक्षी हे आपल्या उपजीविकेसाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी भ्रमंती (fly) करतात. सध्या असेच काही पक्षी राज्यात येऊ लागले आहेत. गोंदियात हजारो किलोमिटरचा (kilometer) प्रवास करून परदेशी पाहुणे येऊ लागले असून विदेशी पक्ष्यांचे आगमन होत आहे. या दरम्यान जलाशय व पाणवठयावर विदेशी पक्षाची शाळा भरल्याचे जाणवू लागले आहे. यावर्षी विदेशी पक्षाचे दर्शन होणार की नाही अशी स्थिती असताना आता कुठे जलाशय व पाणवठयावर विदेशी पक्षी दिसू लागले आहे. या काळात पक्षी अभ्यासकांची (bird watching) व पर्यटकांची एक पर्वणी ठरली आहे. (Foreign birds have started coming to Gondia after crossing thousands of kilometers)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोंदिया जिल्हा (gondia news) तलावांचा जिल्हा अशी ओळखल्या जाणा-या गोंदियातील विविध जलाशयांवर विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. जिल्हा हा राज्यात तलावांचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. दीड हजारांच्यावर जिल्हयात तलाव आहेत. या तलावात सध्या विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट सर्वांना मोहित करीत आहे. गोंदिया, आमगाव, अर्जुनी मोरगाव, देवरी या तालुक्यांतील अनेक तलावात गत 15 दिवसांपासुन विदेशी पक्ष्यांचे आगमन होत आहे.


हेही वाचा - Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती


पक्ष्यांची वैविधता 


जिल्ह्यात यंदा विविध पाणवठ्यांवर ग्रे लग गुज या पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यासोबतच पिटलेस, कॉमन पोचार्ड, वाईट आय पोचार्ड, युरेशियन विजन, मलाई गार्गणी, कोंब डक, लेसर विसलिग डक, कुडस, विजन, गार्गणी, युरोप, आशिया, जपान व चीन देशात आढळणारे कॉमन टिल तसेच युरोप, आशिया व अमेरिकेत आढळणारे पिटेल, टपटेल, पोचार्ड, लिटल ग्रेब, वुडलैंड पायपर (छोटी तुतवार), युरेशियन कलूं, लिटिल स्टिट, रिंग प्लेवर, मार्स हेरीयर, पेंटेड स्नाईप, ग्रे हे रान, कोम्बच डक (नाकेर) आदी प्रजातीचे पक्षी दिसून येत आहेत.


दरम्यान नोव्हेबर ते जानेवारी महिन्यात विदेशी पाहुने मोठ्या प्रमाणात असतात तसेच यांना बघण्यासाठी पर्यटकांची मैफिल सुद्धा जमत असून दूरदूरवरून पर्यटक गर्दी करत आहे. सध्या असे पक्षी पाहणं हे केवळं नागरिकांसाठीच नाही. तर पक्षी निरिक्षकांसाठी आणि अभ्यासकांसाठी मोठी पर्वणीच ठरली आहे. गोंदियाच्या नागरिकांनी आणि अनेक पक्षीप्रेमींनी हे पक्षी पाहण्यासाठी नक्कीच जावे कारण असे क्षण फार क्वचित घडतात.